जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मिल्लत हायस्कूल परिसरातून कत्तलीसाठी आणलेल्या पाच गुरांची सुटका करण्यात एमआयडीसी पोलीसांनी यश आहे आहे. ही कारवाई शनिवारी २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मिल्लत हायस्कूल परिसरात कत्तलीसाठी ५ गुरे आणले असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गावीत यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मिल्लत हायस्कूल परिसरात छापा टाकला. यावेळी ५ गुरांना चारापाण्याची कोणतीही सोय नसल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलीसांनी पाचही गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्टेबल इम्रान बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मजर खान सुजत खान वय ३४ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.