जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ईच्छादेवी पोलीस शेजारी सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर वाहनात गॅस भरतांना सिलींडरचा स्फोट झाला होता. यामध्ये दोन दिवसांपुर्वी वाहनात बसलेल्या भरत दालवाला यांचा मृत्यू झाला होता. वडीलांपाठोपाठ दोन दिवसात सुरज भरत दालवाला (वय २३, रा. यमुना नगर) या तरुणाचा देखील मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. स्फोटातील गंभीर जखमींपैकी चौथा बळी गेल्यानंतर देखील जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल घेतल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
जळगाव शहरातील यमुना नगरात राहणारे भरत दालवाले यांच्याकडे पुण्याहून नातेवाईक आले होते. त्यांना घेवून ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरावर जाण्यासाठी त्यांनी वाघ नगरातील संदीप शेजवळ यांचे वाहन बुक केले. ५ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ते अमळनेरला जात असतासंना वाहन चालक ईच्छदेवी पोलीस चौकीशेजारी असलेल्या गॅस रिफिलींग सेंटवर वाहनात गॅस भरण्यासाठी थांबला. दरम्यान, गॅस सिलींडरचा स्फोट होवून वाहनात बसलेल्या दालवाले कुटुंबियांसह दहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या सुरज याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्याच्यावर उपचार सुरु असतांना सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
.दालवाले कुटुंबियांची आर्थीक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. भरत दालवाले हे मजूरी करीत होते तर त्यांचा मोठा मुलगा सुरज हा शहरातील कापड दुकानात बिलींगचे काम करुन वडीलांना हातभार लावित होता. गॅस सिलींडरच्या स्फोटात त्यांचे संपुर्ण कुटुंब गंभीररित्या भाजले गेले होते. दोन दिवसांपूर्वीच शनिवारी भरत दालवाले यांचा मृत्यू झाला होता, आता त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने दालवाले कुटुंबियांवर दु:खा डांेगर कोसळला आहे.
अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस सिलींडर स्फोटात चार जणांचे बळी गेले असून अजून सहा जणांवर पुणेसह खासगी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. यातील पाच जणांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. एवढी मोठी घटना घडून देखील जिल्हा प्रशासनासह पोलीस दलाकडून मयतांच्या कुटुंबियांची अद्याप दखल घेतली न गेल्याने नातेवाईकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.