काही प्रभागात बिनविरोध निवड होण्याची शक्यता
सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या चिनावलची निवडणूक येत्या ५ नोव्हेंबर रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी ५ तर सदस्यांच्या १७ जागांसाठी ४६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात काही प्रभागात परस्पर विरोधी उमेदवारी अर्ज नसल्याने काही जागा बिनविरोध होणार आहे .
रावेर तालुक्यातील चिनावल ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाही करण्यात आला आहे. निवडणुकीत सरपंचपदासाठी एससी साठी राखीव आहे. पारंपरिक भाजप प्रणित व काँग्रेस प्रणित पँनल च्या उमेद्वारासह अपक्षांनी ही अर्ज दाखल केले आहे माघारी नतंर खरे चित्र स्पष्ट होईल तर ६ प्रभागातील होणार्या निवडणुकीसाठी ४६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
यात प्रभाग क्रमांक २, ३, ४, व ५ नंबर प्रभागात काही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून औपचारिकता पूर्ण होणे बाकी आहे. तर बाकीच्या जागांवर मोठी चुरस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच जागी मातब्बर उमेदवार राहणार असल्याने खरे चित्र माघारी नतंरच स्पष्ट होईलच पण आजपासूनच गावात सरपंच व कोणत्या प्रभागात कोण निवडून येईल या बाबतची चर्चा चिनावल व परिसरात रंगत आहे.