Home राष्ट्रीय मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना अटक

मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना अटक


masood azhar 759 1

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) आज पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर या मसूद अझहरच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र ही कारवाई कुणाच्याही दबावाखाली येऊन करण्यात आलेली नाही, असा दावा पाकिस्तानचे मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी केला आहे.

भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअरस्ट्राइकनंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर चौफेर दबाव आला होता. पाकिस्तान सरकार ही कारवाई कुठल्याही दबावाखाली येऊन केली नसल्याचे म्हणत असले तरी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव होता. त्यामुळेच मसूद अझहरच्या भावांवर कारवाई केली गेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound