चाळीसगावातून ४२ वर्षीय व्यक्ती बेपत्ता!

चाळीसगाव , प्रतिनिधी ।  भाच्याच्या लग्नाला गेलेल्या ४२ वर्षीय व्यक्ती हा बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शहरातील रामकृष्ण नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुनिल बद्रीनाथ चव्हाण (वय-४२ रा. पिंपरखेड ता. चाळीसगाव) हा वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत.  त्याला मद्यपान करण्याची सवय जडल्याने गेल्या एक महिन्यापासून त्यावर औषधोपचार सुरू होते. दरम्यान औषधोपचार सुरू असल्याने सुनिल चव्हाण याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. मात्र ११ रोजी भाच्याचे  लग्न असल्याने सकाळी ११ वाजता परिवारासह तो चाळीसगाव शहरातील रामकृष्ण नगर येथे आलेला होता. १३ रोजी जेवणाचे कार्यक्रम हे दुपारी ४ वाजेपासून तर सायंकाळी ५:३० दरम्यान सुरू होता. तोपर्यंत सुनिल हा मंडपात दिसून आला. परंतु ५:३० वाजताच तो कोणालाही दिसून आला नाही. नातेवाईकांकडे व परिसरात शोधाशोध केली असता तो मिळून आला नाही म्हणून हरवल्याची खात्री झाल्याने भाऊ अनिल बद्रीनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भट्टू पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content