चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडाळा-वडाळी येथे आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 400 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या महागड्या समजल्या जाणाऱ्या सीबीसी,हिमोग्लोबिन,टायफॉईड,डेंगू या तपासानींचा प्रामुख्याने समावेश होता.दरम्यान, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे यांच्या विशेष प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वी झाला.
पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे यांनी 400 महिला भगिनींना रक्त तपासणी करण्यासाठी तयार केले. महालॅब आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने तपासणी करण्यात आली. त्यात सीबीसी,हिमोग्लोबिन,टायफॉईड,डेंगू या तपासनींचा समावेश होता. या तपासनींसाठी बाहेर साधारण 3000 ते 5000 रुपये खर्च येतो. परंतु सभापती स्मितल बोरसे यांनी पुढकार घेतल्यामुळे या सर्व चाचण्या मोफत घेण्यात आल्या. यावेळी माध्यमिक विद्यालय वडाळा येथील विद्यार्थींनीनी मदत केल्यामुळे आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याचबरोबर सभापती स्मितल बोरसे यांनी आज पहाटे 5:30 वाजता उमंग समाज शिल्प परिवार आयोजित मॅरेथॉन स्पर्धला देखील उपस्थिती नोंदवली. त्यानंतर सेन्ट जोसेफ स्कूल आयोजित जिल्हा परिषद शाळा बिलाखेड येथे महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. विठ्ठल मंदिर चाळीसगाव येथे रयत सेना आयोजित कार्यक्रम भेट दिली. पंचायत समितीतर्फे अंगनवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रम प्रसंगी सभापती स्मितल बोरसे या उपस्थित होत्या. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, संपदाताई पाटील, डॉ सौं.देवरे,स्मिता बच्छाव,ग्रामसेवक शेवाळे, लिली सिस्टर, प्रशांत मिटकरी,सरपंच सौं. आमलेताई, बाबाजी सुरवंशी, रवींद्र आमले, शांताराम पाटील ,आनंद सुरवंशी, संजय आमले, डॉ वीरेंद्र पाटील, संतोष सोनवणे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते