अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन तरूणांनी कारांची चोरी केल्याची धक्कादायक अकोला शहरातून समोर आली आहे. शहरातील ४ अल्पवयीन तरूणांनी एमआयडीसी भागात असलेल्या महिंद्रा शोरूममधील स्टॉक यार्डमधून ३ महागडया कार चोरल्या आहेत. त्या काराची किंमत २६ लाखांपेक्षा अधिक वर्तविली जात आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात त्या अल्पवयीन तरूणांना ताब्यात घेतले आहे.
त्यांनी पोलिस तपासात ही माहिती दिली की, सोशल मीडियावर रिल्स बनवून लोकप्रिय होण्यासाठी त्यांनी महिंद्रा शोरूममधून तीन महागडया कार चोरल्या होत्या. वाहने चोरणारे सर्व अल्पवयीन मुले चांगल्या कुटुंबातील आणि ख्यातनाम शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, इतर मित्रांमध्ये वर्चस्व, सोशल मीडिया तसेच इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला एक गाडी आणि त्या पाठोपाठ 2 गाड्या या पाच मित्रांनी चोरल्या आहेत. शोरूमचे जनरल मॅनेजर सागर कड यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. मिर्झा उबेद, बेदमिर्जा, सईद बेग असे कार चोरणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत तब्बल 70 लाखांहुन अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.