मुंबई -बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या निर्मिती संस्थांसह (प्रॉडक्शन हाऊसेस) ३८ संस्थांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. यात सलमान खान, शाहरुख खान आणि आणि अमिर खान या मंडळींच्या निर्मिती संस्थांसह इतर संस्थांनी याचिका दाखल केली आहे.
बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे. गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचं काम या सगळ्यांनी केल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात या प्रॉडक्शन हाऊसेसनी बेजबाबदार बातमीदारीचा ठपका ठेवला आहे.
दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.
बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.