जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केटजवळ एका व्यापाऱ्याला अज्ञात तीन जाणांनी धक्का मारून त्यांच्या खिश्यातील ३७ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक तोलाराम हेमनाणी वय ५४ रा. सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता दिपक हेमनाणी हे महात्मा गांधी मार्केटजवळ कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी अज्ञात तीन जणांनी धक्काबुक्की करत त्यांच्या खिश्यातून ३७ हजारांची रोकड लांबविली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नजीकच्या शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.