जळगाव प्रतिनिधी । फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून यांच्या बँक खात्यातून ३४ हजार ४३६ रूपये काढून ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना २५ मार्च रोजी उघडकीला आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुरलीधर रघुनाथ माळी (रा.व्यंकटेश नगर) यांनी मुलाला फी साठी पैसे पाठविले होते. मात्र, मुलाच्या खात्यावर पैसे न जमा झाल्यामुळे त्यांनी फोन पे कस्टमर केअरला संपर्क साधला. नंतर वरिष्ठांचा क्रमांक मिळविला. त्यावेळी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून ओटीपी पीन जाणून घेतले. काही वेळातच मुरलीधर यांना त्यांच्या बँक खात्यातून २४ हजार ९८७, ९ हजार ९९९ व ४५० रूपये कपात झाल्याचे तीन संदेश प्राप्त झाले. आपली फसवणूक होत असल्याचे कळताच, त्यांनी गुरूवारी २५ मार्च रोजी सायबर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.