पोटनिवडणूकीसाठी इच्छुकांकडून ३१४ अर्ज दाखल

जळगाव प्रतिनिधी । जिल्हयात ग्रा.पं.सदस्यांचे अनर्हता, राजीनामे वा निधन अशा विविध कारणांमुळे १६२ ग्रा.पं. अंतर्गत २२९ सदस्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार १६२ ग्रा.पं.तील २२९ सदस्यांच्या या रिक्त जागांसाठी ६ डिसेंबर रोजी मुदती अंती ३१४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले असून २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पोटनिवडणूकीसाठी सर्वात जास्त १९ ग्रा.पं.चाळीसगांव तालुक्यात असून २७ सदस्यांसाठी ३३ उमेदवारी अर्ज, तर चोपडा तालुक्यात १२ ग्रा.पं.च्या २० प्रभागातील २२ जागांसाठी ३२ अर्ज तर सर्वात कमी बोदवड तालुक्यात ३ ग्रा.पं. ३ प्रभागात ३ सदस्यांसाठी ३ अर्ज असे एकमेव तालुका आहे.

जिल्ह्यात १५ तालुकास्तरावर १६२ ग्रामपंचायतीतील १९९ प्रभागातील ग्रा.पं.सदस्यांचे अनर्हता, राजीनामे वा निधन अशा विविध कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्याचे निर्देशानुसार जळगाव तालुक्यात ७ ग्रा.पं.च्या ८ प्रभांगांमध्ये प्रत्येकी १ सदस्यांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जामनेर तालुक्यातील १४ ग्रा.पं.अंतर्गत १९ प्रभागांत २६ सदस्यांची पदे रिक्त असून २६, धरणगांव तालुक्यात ९ ग्रा.पं.च्या ९प्रभागात ९ सदस्यांसाठी ७, एरंडोल तालुक्यात ९ ग्रा.पं.च्या १३ प्रभागांतर्गत १३ सदस्यांसाठी ३५ अर्ज दाखल आहेत. पारोळा तालुक्यातील १० ग्रा.पं.अंतर्गत ११ प्रभागांसाठी १४ अर्ज, भुसावळ तालुक्यात ८ ग्रा.पं.तील ९ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी १९, मुक्ताईनगर तालुक्यातील १३ ग्रा.पं.च्या १७ प्रभागांतील १७ जागांसाठी २३, बोदवड तालुक्यात ३ ग्रा.पं. साठी ३, यावल ११ ग्रा.पं.च्या १८ प्रभागांतील २५ रिक्त जागांसाठी १६ अर्ज, रावेर तालुक्यात १२ ग्रा.पं.च्या १३ प्रभागांत १५ सदस्यांसाठी १४, अमळनेर तालुक्यात १३ ग्रा.पं.च्या १५ प्रभागातील १५ जागांसाठी १३, चोपडा १२ ग्रा.पं.च्या २० प्रभागातील २२ जागांसाठी ३२, पाचोरा तालुक्यात १२ ग्रा.पं.च्या १४ प्रभागातील १९ सदस्यांसाठी ५१, भडगाव तालुक्यातील १० ग्रा.प.१० प्रभागांसाठी १० सदस्यांसाठी १८ तर चाळीसगांव तालुक्यात १९ ग्रा.पंं.च्या २१ प्रभागांतील २७ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ३३ अर्ज मुदतीअंती दाखल झाले असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे यांनी दिली.

 

 

Protected Content