Home Uncategorized कचरा वाहनांसाठीचे रॅम्प अर्धवट; उपमहापौर मनोज चौधरींची मनपा प्रशासनावर टीका

कचरा वाहनांसाठीचे रॅम्प अर्धवट; उपमहापौर मनोज चौधरींची मनपा प्रशासनावर टीका


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कचरा संकलनाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कचरा रॅम्प उभारणीच्या कामात महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. शहरातील विविध भागात कचरा वाहनांसाठी रॅम्प उभारण्याचा मक्ता देऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे, तरीही हे काम अद्याप अपूर्णच आहे. या विलंबावरून उपमहापौर मनोज चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासकीय यंत्रणा संबंधित मक्तेदाराकडून काम करून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मक्तेदार काम करत नसेल तर मक्तेदारावर कारवाई का करण्यात आली नाही , असा सवाल त्यांनी उपस्थित केला मक्तेदार काम करत नसेल तर मक्तेदारावर कारवाई का करण्यात आली नाही , असा सवाल त्यांनी उपस्थित केला

जळगाव महानगरपालिकेतर्फे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सुटसुटीत व्हावे, यासाठी टीबी हॉस्पिटल परिसर, सम्राट कॉलनी आणि खंडेराव नगर या तीन महत्त्वाच्या ठिकाणी कचरा वाहनांसाठी रॅम्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून रीतसर मक्ता देखील देण्यात आला. मात्र, अडीच वर्ष उलटूनही हे रॅम्प प्रत्यक्ष वापरात येण्याऐवजी अर्धवट अवस्थेत पडून आहेत. मक्तेदाराने हे काम का पूर्ण केले नाही आणि प्रशासन त्याच्यावर कारवाई करण्यास का कचरत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात बोलताना उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षांच्या कालावधीत महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होती. या काळात लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्याचा फायदा घेत प्रशासनाने या महत्त्वाच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. एखादे काम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांचा अवधी मिळूनही ते पूर्ण होत नसेल, तर संबंधित मक्तेदाराला अभय कोणाचे आहे? असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केला आहे. शहरातील कचरा कोंडी फोडण्यासाठी हे रॅम्प तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे होते, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे हे प्रकल्प कागदावरच रखडले आहेत. या रॅम्पच्या अपूर्ण कामामुळे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, याचा थेट परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound