रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातीत ३१ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले आहे.
आज येथील तहसिल कार्यलायत ४८ ग्राम पंचायत निवडणूकसाठी आलेल्या १ हजार १८४ उमेदवारी अर्जाची छाणनी करण्यात आली यामध्ये ३१ उमेदवारी अवैध ठरवले आहे. यामध्ये मस्कावर बु १ धामोडी १ उदळी खु १ उदळी बु १ तासखेडा १ पाडळे खु १ भोर १ कर्जोत १ के-हाळा बु १ वाघाडी ३ रसलपुर ७ रमजीपुर १ बक्षीपुर १ निंबोल १ ऐनपुर १ वडगाव १ विवरे खु १ निंभोरा बु १ विवरे बु ५ असे एकूण ३१ उमेदवारी अर्ज छाणनी मध्ये निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरवले आहे.