Home धर्म-समाज यावलमध्ये रंगपंचमी व रमजानचा सुंदर संगम; टिळा होळीने दिला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

यावलमध्ये रंगपंचमी व रमजानचा सुंदर संगम; टिळा होळीने दिला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात रंगपंचमी आणि पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडले. महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टिळा होळी आणि पर्यावरणपूरक धुलीवंदन कार्यक्रमातून सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

हिंदू बांधवांची होळी आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना एकाच काळात सुरू असताना या दोन्ही सणांचा सन्मान राखत एकतेचे प्रतिक म्हणून हा कार्यक्रम पार पडला. प्राचीन परंपरेप्रमाणे रंगपंचमीचा टिळा होळी उत्सव साजरा करण्यात आला. यावल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) गटाचे विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्या भुसावळ मार्गावरील फार्महाऊसवर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.

या कार्यक्रमात शिवसेना (उबाठा) गटाचे गटनेते सागर चौधरी, यावल नगर परिषद शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती पराग सराफ, नगरसेवक निसार मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हिंदू-मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मजहर भाई, हाजी फारूख शेख, अब्दुल करीम मनियार, एजाज पटेल, सारंग बेहडे, अशोक पाटील, पिन्टू कासार, किशोर माळी, उमर कच्छी, निलेश बारी, समीर खान, पत्रकार डी. बी. पाटील, अय्युब पटेल, शेखर पटेल, सुनिल गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरे करण्यात आले. सहभागी नागरिकांनी एकमेकांना टिळा लावून शुभेच्छा दिल्या आणि धार्मिक सौहार्दाचे उदाहरण समाजासमोर ठेवले. सणांच्या निमित्ताने द्वेष आणि भेदभाव दूर ठेवून प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणे हीच खरी भारतीय संस्कृती असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

संपूर्ण कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा आढ्यतेचा भाव न ठेवता साधेपणाने आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सण साजरा करण्यात आला. दोन्ही समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद दि


Protected Content

Play sound