Home क्रीडा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत क्रीडा महोत्सवाचा समारोप

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत क्रीडा महोत्सवाचा समारोप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा रंगल्या असून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला.

या क्रीडा महोत्सवात महिला क्रिकेट स्पर्धेत ‘आराघ्या’ संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयी संघात भारती जगताप, श्रुती गेडाम, गौरी कुंभाळकर, तिलोत्तमा चौधरी, समीक्षा गोपाळ, तृप्ती पाटील, श्रद्धा भुतडा, ऋतुजा लोखंडे, हृतुजा इंगळे, आचल आणि निशा उईके या खेळाडूंचा समावेश होता. संघाने संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट समन्वय, आत्मविश्वास आणि संघभावना दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

पुरुष क्रिकेट स्पर्धेत ‘रिसेन’ संघाने शानदार खेळ करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या संघात नईम तडवी, ओम चौधरी, चंदन मौर्या, नौमान मुस्तफिज, हमजा सिद्दीकी, प्रणव मुखेडकर, आदित्य बच्छाव, रोहित मारू, प्रफुल पंचोदबरिया, जीत खत्री, फहीम खान आणि झैद शेख यांचा समावेश होता. त्यांच्या दमदार फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीमुळे हा विजय शक्य झाला.

खो-खो स्पर्धेतही ‘रिसेन’ संघानेच आपले वर्चस्व कायम ठेवत विजेतेपद मिळवले. विजयी संघात दिव्या विशे, पूजा दानवे, सायली शेलके, साक्षी इंगळे, साक्षी खोंडले, तनिषा पवार, सानिका लाखोटिया, वैष्णवी सावंत आणि मिसबह यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. गोळाफेक स्पर्धेत मुलींच्या गटात खुशी अर्जपुरे हिने ५.४ मीटर अंतरावर गोळा फेकत प्रथम क्रमांक पटकावला, तर ट्विंकल माळी आणि वैष्णवी गुट्टे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. मुलांच्या गटात युवराज पाटील ८.२ मीटर अंतरासह प्रथम, अंकित राऊत द्वितीय आणि गणेश दुधाभाते तृतीय क्रमांकावर राहिले.

बॅडमिंटन स्पर्धेत भारती शेजुळ आणि ट्विंकल माळी या जोडीने विजेतेपद पटकावले, तर समृद्धी आणि खुशी जोगे या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचा विकास होण्यास मदत झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.


Protected Content

Play sound