Home Uncategorized आ. खडसे बंगल्यातील चोरी प्रकरणात मोठा खुलासा; चोराला आश्रय देणारा गजाआड

आ. खडसे बंगल्यातील चोरी प्रकरणात मोठा खुलासा; चोराला आश्रय देणारा गजाआड


जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तिघ चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित निष्पन्न करण्यात यश आले. चोरी करण्यापुर्वी आणि केल्यानंतर चोरटे मास्टर कॉलनीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे थांबले होते. त्यामुळे चोरट्यांचा आश्रय देणारा नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख (वय ३९, रा. मास्टर कॉलनी) याला गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता या गुन्ह्यात आरोपी करुन अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली.

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या शिवराम नगरातील मुक्ताई बंगल्यात सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली होती. त्यांच्या बंगल्यातून ३७ हजारांच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. चोरी केल्यानंतर चोरटे तीन बॅग घेवून दुचाकीवरुन ट्रिपलसीट जातांना शेजारील बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. घटनेचे गांर्भीय लक्षात घेत रामानंद नगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक चोरट्यांच्या शोधार्थ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांच्याकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात होता.

आमदार खडसेंच्या घरी चोरी करणारे चोरटे हे काही दिवसांपुर्वी मास्टर कॉलनीत राहणारे त्यांचे नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख यांच्याकडे आले होते. काही दिवस जियाउद्दीन यांच्या घरी मुक्कामी राहिल्यानंतर त्यांनी सोमवारी मध्यरात्री खडसेंच्या बंगल्यात चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. चोरी करण्यासाठी चोरट्यांनी जियाउद्दीन शेख यांची (एमएच १९, ईआर ५५३९) क्रमांकाच्या दुचाकी वापरली होती. चोरी केल्यानंतर चोरटे पुन्हा जियाउद्दीन शेख यांच्या घरी गेले. त्यांनी दुचाकी त्यांच्याकडे लावून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांचा आश्रय देणाऱ्या जियाउद्दीन शेख यांना गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे.


Protected Content

Play sound