रावेर येथे गुरांचे ३०० किलो मांस जप्त

meat truck

रावेर (प्रतिनिधी) शहरात पोलिसांनी गुरांचे २५० ते ३०० किलो मांस जप्त केले असून त्याची बाजारात किंमत २५ हजार रुपये आहे. सोबतच एक लाख रुपये किंमतीची पिकअप महिंद्रा बोलेरो गाडी असा सुमारे एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी येथील पोलिसात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी शहरातील रसुलपूर रोडवरील इमामवाडा परिसरात साफळा रचला असता यात एक संशयित पिकअप व्हॅनला (क्रमांक एम एच-०४, ई वाय २५३५) अडवून तपासणी करण्यात आली असता, वाहनात गुरांचे मांस आढळून आले. वाहनाबरोबर असलेला शेख एजाज शेख अफजल (वय २८), शेख शरीफ खलील(वय ३७), शेख आरिफ शेख खलील (वय ३९) सर्व रा. इमामवाडा रावेर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली असता, वाहन व गुरांचे मांस हे परराज्यातून आणले असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी हे २५० ते ३०० किलो मांस जप्त केले असून एक लाख रुपये किंमतीची पिकअप व्हॅन असा एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तिघा आरोपींविरुद्ध पोलिसानी भाग ६ गुरनं ७१/२०१९, प्राणी संरक्षण कायदा १९७६चे सुधारीत कायदा २०१५ चे कलम ५(क)(ड)९ प्रमाणे राजेन्द्र करोडपती यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार नजीम शेख करीत आहेत.

Protected Content