नवीन घर खरेदीसाठी विवाहितेकडे ३० लाखांची मागणी; चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । नोकरी करण्यासह माहेरहून नवीन घर खरेदी करण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी करत विवाहितेला बेदम मारहाण करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पतीसह सासू-सासऱ्यांकडे मंडळी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशी कॉलनीतील माहेर असलेल्या प्रियंका सचिन पानसरे (वय-३३) यांचा विवाह नगर जिल्ह्यातील राहता येथील रहिवासी सचिन अरुण पानसरे यांच्याशी झालेला आहे.  विवाहितेने नोकरी करावी तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरहून ३० लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही या कारणावरून तिला वेळोवेळी बेदम मारहाण व शिवीगाळ करत दमदाटी करून छळ केला, तसेच सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला मानसिक त्रास दिला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पती सचिन अरुण पानसरे, सासू सुमन अरुण पानसरे, सासरे अरुण धोंडीराम पानसरे आणि दीर सागर अरून पानसरे रा. राहता जि. नगर यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.

Protected Content