Home क्राईम ३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या !

३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या !

0
25

 

लखनऊ, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खीरी जिल्ह्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करण्यात आलीय. गुरुवारी उसाच्या शेतात या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. लैंगिक अत्याचारानंतर मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. लखीमपूर खीरी जिल्ह्यात २० दिवसांत घडलेली ही बलात्काराची तिसरी घटना आहे.

अत्याचारित तीन वर्षांची मुलगी बुधवारपासून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुरुवारी गावाजळच या मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला आणि तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. मुलीच्या डोक्यावर वार करण्यात आल्याच्या खुणा आहेत.

मुलीच्या वडिलांनी गावातच राहणाऱ्या एका व्यक्तीवर आपल्या मुलीच्या खुनाचा आरोप केलाय. जुन्या शत्रुत्वामुळे आपल्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मुलीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनामध्ये लैंगिक अत्याचाराच्या संशयाला दुजोरा मिळाला.


Protected Content

Play sound