नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मौदा येथे भटक्या कुत्र्याने एका तीन वर्षीय मुलावर हल्ला करत त्याच्या शरीराचे लचके तोडले. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी मौदा शहरातील गणेश नगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
वंश अंकुश शहाणे असे कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मौद्यात गेल्या काही दिवसांपासन भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन त्यांना जखमी केले असून या कुत्र्यांची परिसरात दहशत आहे. मंगळवारी मौदा येथे राहत असळलेय शहाणे यांचा तीन वर्षांचा मुलगा मुलगा वंश शहाणे हा संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. यावेळी रस्त्यावर फिरत असलेल्या एका भटक्या कुत्र्याने वंशवर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने वंशच्या मानेवर आणि हातावर चावे घेत त्याच्या शरीराचे लचके तोडले. यात वंश हा गंभीर जखमी झाला. वंशचा ओरडण्याचा आवाज आल्यावर घरातील व्यक्तिनी बाहेर धाव घेत कुत्र्यच्या तावडीतून वंशला सोडवले. त्यांनी तातडीने त्याला मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, कुत्र्याच्या हल्ल्यात उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला.