नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात हनुमान चालीसावरून एकमेकांसमोर उभे ठाकलेले खा. नवनीत राणा, खा. संजय राऊत हे दाम्पत्यासह लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र व्यवहार समितीच्या दौऱ्यात संसदेचे ३० खासदार असून राज्यातील खा. राणा, राउत आणि प्रकाश जावडेकर या सदस्यांचा समावेश आहे.
परराष्ट्र व्यवहार समिती अभ्यास दौऱ्यासाठी देशभरातील ३० खासदारांची निवड करण्यात आली आहे. या ३० सदस्यांचा गेल्या चार दिवसापासून लेह-लडाख दौरा सुरु आहे. यात खासदारांना त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सोबत घेण्याची परवानगी असते.
यात राज्यात हनुमान चालीसावरून आव्हान प्रतिआव्हान देणारे शिवसेनेचे खा. संजय राऊत, खा. नवनीत राणा, आ. रवि राणा, खा. प्रकाश जावडेकर या खासदारांचा समावेश आहे. या दौऱ्यानिमित्त वैयक्तिक अथवा राजकीय वैर अथवा हेवेदावे बाजूला सारून संवाद साधण्याची परंपरा आहे.
परंतु परराष्ट्र व्यवहार समितीच्या दौऱ्यात खा. राऊत आणि खासदार आणि आमदार राणा दाम्पत्य समोरासमोर येण्याची शक्यता असून राजकीय वैर बाजूला ठेवून या दोघांमध्ये संवाद, चर्चा होणार कि नाही याची चर्चा राज्यात आहे.