जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील एस सेक्टर मधील साई प्रेरणा इंडस्ट्रिज कंपनीचे मागच्या बाजूचे लोखंडी दरवाजा उघडून तांबे, अल्यूमिनीअमच्या वायरी, इलेक्ट्रीक मोटार, लोखंडी पॅनलसह इतर साहित्य असा एकुण ३ लाख ३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील वाघ नगरात राहणार सुनिल बाबुलाल सोनवणे वय ४८ यांची एमआयडीसीतील एस सेक्टर मधील साई प्रेरणा इंडस्ट्रिज कंपनी आहे. २७ जानेवारी रात्री ८ ते ६ फेब्रुवारी दरम्यान त्यांची कंपनी बंद असतांना अज्ञात चोरट्याने कंपनीच्या मागचे लोखंडी दरवाजा उघडून कंपनीतून तांबे, अल्यूमिनीअमच्या वायरी, इलेक्ट्रीक मोटार, लोखंडी पॅनलसह इतर साहित्य असा एकुण ३ लाख ३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला. त्यानंत कंपनीचे मालक सुनिल सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.