जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरातून ३ बाधित रूग्ण आढळून आले तर ३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरात १ तर भुसावळ तालुक्यात २ असे एकुण तीन बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ४० हजार १०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर २१ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.