चाळीसगाव, प्रतिनिधी | वनक्षेत्रातील मौजे मेहणबारे शिवारात दिनांक ३० जून २०१५ रोजी ठार केलेल्या मादी बिबट्याला ठार मारल्याच्या प्रकरणातील सर्व ११ फरार आरोपींना काल (दि.२) सायंकाळी येथील वनकर्मचा-यांनी अटक केली आहे.
अटक केलेल्यात नाशिक जिल्ह्यातील सोमा गोटू पवार, पोपट चैत्राम पवार, सुभाष गोटू पवार, प्रकाश मंगळू गांगुर्डे, दामू मोतीराम पवार, सुक्राम चिला
गांगुर्डे, विजय लहानू गांगुर्डे, चिंतामण नाना गावित, सोमनाथ काळू गांगुर्डे, रामदास निंबा पवार व दिलीप पंडित गांगुर्डे यांचा समावेश आहे. या आरोपींना येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत वनकोठडी दिली आहे.
या मोहिमेत केशव फंड सहायक वन संरक्षक रोहयो व वन्यजीव जळगाव, धनंजय ग. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव (प्रा.), राजेश ठोंबरे, मानद वन्यजीव रक्षक, जळगाव जिल्हा, र. ग. राणे वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक जळगाव, रामदास चौरे, वनपाल जुवाडौँ, प्रकाश देवरे, वनपाल घोडेगाव, रुमा कुळकर्णी लिपिक, संजय चव्हाण, संजय जाधव, खाकुराम बडूरे, प्रवीण गवारे, राहुल पाटील, अजय महिरे, कविता पाटील, उज्वला पाटील वनरक्षक, बाळू शितोळे, नाना जयराम सोनवणे, तानाजी भिला सोनवणे, श्रीराम राजपूत, संजय देवरे, अशोक पाटील, नाना पाटील, भटू आहिरे, दिलीप निकम, वनमजूर दिनेश
कुळकर्णी, डाटा ऑपरेटर, राहुल मांडोळे, भगवान चीम, सचिन कुमावत, चंद्रकांत नागरे, वाहन चालक यांनी सहभाग घेतला. पुढील तपास केशव फंड, सहा. वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) जळगाव वनविभाग, जळगाव व धनंजय ग. पवार वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव (प्रा.) हे करीत आहेत.