Home आंतरराष्ट्रीय बहरीनमध्ये भूमिकाचा डंका; २०० मीटर धावस्पर्धेत भारतासाठी ब्रॉन्झ मेडल

बहरीनमध्ये भूमिकाचा डंका; २०० मीटर धावस्पर्धेत भारतासाठी ब्रॉन्झ मेडल


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोथळी गावातील भूमिका संजय नेहते हिने बहरीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत आपल्या अविश्वसनीय वेग आणि जिद्दीच्या बळावर २०० मीटर धावस्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे. या यशामुळे भारताचा आणि मुक्ताईनगर तालुक्याचा मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावला आहे.

भूमिका नेहते हिने ग्रामीण भूमीवरून थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचत आपली जिद्द, शिस्त आणि कठोर परिश्रमाचे अप्रतिम उदाहरण सादर केले आहे. अत्यंत मर्यादित साधनांमध्ये प्रशिक्षण घेत तीने देशाचे नाव उज्ज्वल केले असून तरुण पिढीसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. तिच्या या यशाचा आनंद कोथळीपासून संपूर्ण जिल्ह्यापर्यंत व्यक्त केला जात आहे.

स्पर्धेदरम्यान भूमिका हिने प्रचंड आत्मविश्वास, तांत्रिक तयारी आणि दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत निर्णायक फेरीत प्रवेश मिळवला. अखेरच्या फेरीत तीने प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आणि आपल्या मेहनतीची सुवास जागतिक मंचावर पसरवली.

गावकऱ्यांनी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिच्या प्रशिक्षणासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या प्रशिक्षकांचाही गौरव करण्यात आला आहे. मुक्ताईनगर आणि परिसरात तिच्या स्वागतासाठी तयारी सुरू असून, शालेय विद्यार्थी आणि युवकवर्ग तिच्या यशाने प्रेरित होत आहेत.


Protected Content

Play sound