भंडारा-लाईव्ह ट्रेंड न्युज वृत्तसेवा | एका वाहनांमध्ये बसून धान कापणी केल्यानंतर गावाकडे परतणाऱ्या महिला मजुराचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २७ महिला जखमी झाल्या आहे. या सर्व जखमी महिला पवनी तालुक्यातील नेरला या गावातील रहिवासी आहेत. ही घटना भंडारा जिल्हयामधील पवनी तालुक्यातील सोनेगाव येथे घडली आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणीची लगबग सुरू आहे. विदर्भात अवकाळी पावसाचे सावट लक्षात घेता शेतकरी हार्वेस्टर आणि मजुरांच्या साहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत. त्यामुळे मजुरांची मोठ्या प्रमाणात मागणी असून धान कापणीला मजूरच मिळत नसल्याचे चित्र आहे.
परिणामी, दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेतली जात आहेत. नेरला येथून सर्व २७ महिला एका वाहनाने पवनी तालुक्यातील सोनेगावाला धान कापणीसाठी गेल्या होत्या. रविवार सकाळी सर्व मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील गावातून सोनेगाव येथे धान कापणीला टाटाएस वाहनने (एमएच 36 एफ1060 ) नेहमीप्रमाणे जात होते. त्यानंतर काम आटपून परत येत असतांना वाहनचालक महेंद्र मुरकुटे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन शेतात उलटले. अपघाताची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या सर्व जखमी महिलांवर उपचार सुरू आहे.
वाहन उलटल्याने २७ मजूर महिला जखमी
7 months ago
No Comments