काठमांडू (वृत्तसंस्था) नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 400 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान,मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत असून बारा आणि परसा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
नेपाळ प्रशासनाने बचावकार्य युद्धपातळीवर सुरु केले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 2 एमआय 17 हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले आहे. तर 100 पेक्षा अधिक टीम पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत.