जुगार खेळणारे २७ जुगारी अटक; दीड लाखांसह तीन मोटारसायकली जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरीनाका परिसरात मोठा जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची गुप्त माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली होती. त्यांच्या सुचने नुसार स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने संध्याकाळी अचानक छापा टाकला असता जुगार अड्ड्यावर एकच धावपळ माजली. १ लाख ६७ हजारांच्या रोकडसह तीन मोटारसायकली जप्त करुन २७ जुगारी अटक करण्यात आले आहे.

शहरात सट्टा-पत्ता जुगाराचे अड्डे चालवले जात असल्याच्या गुप्त माहितीवरुन जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सुचने वरुन स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किशन नजन पाटिल, यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. शहरातील नेरीनाका परिसरात गज्या भाऊंचा जुगार अड्डा म्हणुन प्रसीद्ध असलेल्या जुगार अड्ड्यावर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास छपा टाकुन मिळेल त्याला ताब्यात घेण्यास सुरवात केली. एकामागून एक अशा २७ जुगारींना जुगाराच्या खेळातून उचलून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून मोबाईल आणि घोळातील रेाख रक्कम पोलिसांनी उचलून ती मोजली असता १८ मोबाईल आणि १ लाख ६७ हजार रुपये रोख रक्कम मिळून आली असून सर्व जुगारींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा पर्यंत अटकेसह कायदेशीर कारवाई सुरु होती.

 

अटकेतील जुगारी असे

सुनील गबा पाटील (५०, रा. पाचोरा), संदीप रामा गोपाल (२८, रा. वावडदा), पंढरी बाबुराव कोळी (३०, रा. भादली), जगदीश सोमनाथ हळवे (३८, रा. जुने जळगाव), स्वप्निल शंकर हवलदार (३३, रा.  मेहरुण), गजानन रतन चौधरी (५०, रा. तुकाराम वाडी), केशव एकनाथ भोळे (६५, जुना खेडी रोड), नामदेव मानसिंग पाटील (४८, रा. मन्यारखेडा), नंदकिशोर रतन चौधरी (४३, रा. तुकाराम वाडी),  धनंजय दिनेश कंडारे (२७, रा. शनिपेठ), नितीन भास्कर गायकवाड (३९, रा. जुने जळगाव), गणेश तुकाराम पाटील (३६, रा. गुरुकुल कॉलनी),  रवी कमलाकर बाविस्कर (३६, रा. वाल्मीक नगर),  आकाश प्रभाकर पाटील (३०, रा. जुना खेडी रोड), पिंटू सुधाकर भोई (३७, रा. टहाळकी, ता. धरणगाव),  इब्राहिम अकबर सय्यद (६०,  मासूमवाडी), इम्रान शेख सय्यद (४४, रा. मासूमवाडी), मनोज रमेश शिनकर (३०, रा. मारुती पेठ), चंद्रकांत शंकर पाटील (६०, रा.  मन्यारखेडा),  रमेश पुंडलिक सोनार (७१, गिरणा टाकी परिसर), मुकेश शांताराम पाटील (४३, रा. रामेश्वर कॉलनी),  भरत दिलीप बाविस्कर (३८, रा. लक्ष्मी नगर),  अरुण कौतिक चौधरी (४७, रा. सुप्रीम कॉलनी),  मयूर  रामचंद्र कोल्हे (३४, रा. विठ्ठल पेठ), दत्तू भिका सोनवणे (६८, रा. कांचन नगर), नरेंद्र एकनाथ ठाकरे (३३, रा. मेस्को माता नगर), सीताराम ज्योतीराम सोनवणे (४०, रा. तुकाराम वाडी).

 

मोठ्या राजकीय व्यक्तीचा वरद हस्त असल्याचे सांगत हा जुगार अड्डा चालवला जात होता. १ अधिकारी पाच कर्मचारी अशा मोजक्याच पथकाने सुरवातीला छापा टाकला असता पोलिसांना पाहुन जुगार्यांनी धुम ठोकली.मुख्य बाजारपेठेचा परिसर असल्याने जो-तो पळू लागल्याने काही वेळ गोंधळ उडाला. जुगार्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोशल क्लबच्या नावाने जुगार चालवला जात असल्याचे स्पष्ट झाले असून त्या संदर्भात कारवाई करणार्या अधिकाऱ्यांनाही काहींनी संपर्क साधल्याचे सांगण्यात येते.

Protected Content