जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार आज जिल्ह्यातील २६७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आज आढळून आलेल्या अहवालात जळगाव शहरासह जामनेर व चाळीसगावात संसर्ग पुन्हा वाढत आहे. दरम्यान, आज २७१ रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यासोबत आता बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २६७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे आजच २७१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज १३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात २६७ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८६ रूग्ण हे जळगाव शहरातल आहेत. याच्या खालोखाल जामनेर-३४ व चाळीसगाव-२८ रूग्ण आढळले आहे. उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण २३, भुसावळ-८, अमळनेर-४, चोपडा-१६, भडगाव-७, धरणगाव-९, यावल-१२, एरंडोल-५, रावेर-२, पारोळा-१५ एकुण २६७ रूग्ण आज आढळून आले आहे.
तालुकानिहाय एकुण रूग्णसंख्या
जळगाव शहर- २७७८, जळगाव ग्रामीण-५१५, भुसावळ-८७८, अमळनेर-६९३, चोपडा-७४१, पाचोरा-३९१, भडगाव-४१९, धरणगाव-४९०, यावल-४६१, एरंडोल-५०२, जामनेर-७४९, रावेर-६८५, पारोळा-४७०, चाळीसगाव-४७३, मुक्ताईनगर-३३३, बोदवड-२३९, इतर जिल्हे-४१ असे एकुण १० हजार ८५८ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ हजार २८७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार ६५ रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ५०६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.