भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मध्य प्रदेशातील भोपाळमधून एक धक्कादायक घडना समोर आली आहे. एका बेकायदेशीर शेल्टर होममधून २६ मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेल्टर होममध्ये गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुली राहत होत्या. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी पारवालीया भागातील आंच मुलींच्या हॉस्टेलला सरप्राईज भेट दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यांनी जेव्हा रजिस्टर तपासले तेव्हा त्यांना आढललं की ६८ हिंदू मुलींपैकी २६ जणी बेपत्ता आहेत.
प्रियांक यांनी होम शेल्डरचे संस्थापक अनिल मॅथ्यू यांना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर याप्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, शेल्टर होममध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. ते शेल्टर होम बेकायदेशीरपणे चालवण्यात येत होते.
कानुंगो म्हणाले की शेल्टर होम चालणारा मिशनरी काही मुलांना जमवून हॉस्टेल चालवत होता. त्याने काही मुलांना रस्त्यावरुन आणून शेल्टर होममध्ये ठेवलं होतं. शेल्टर होम चालवण्याचा त्याच्याकडे परवाना देखील नव्हता. दाव्यानुसार, मिशनरी मुलांना आणून तो शेल्टर होममध्ये ठेवायचा. तसेच त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जात होती.
शेल्टर होममध्ये ठवण्यात आलेल्या मुली या ६ ते १८ वयोगटातील आहेत. मोठ्या अडचणीनंतर एफआयआर दाखल करुन घेण्यात आलाय. मध्य प्रदेशातील महिला आणि बाल विकास विभाग अशा काही एनजीओंच्या माध्यमातून चाईल्ट हेल्पलाईन चालवू पाहात आहे हे दुर्दैवी असल्याचं कानुंगो म्हणाले.