राष्ट्रीय क्रीडा दिनी होणार २५ क्रीडा शिक्षकांचा सत्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी असोसिएशन जळगाव व गोदावरी अभियात्रिकी महाविद्यालयाच्या वतीने उद्या सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता २५ क्रीडा शिक्षकांचा सत्कार सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. केतकी पाटील,  डॉ. वैभव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, डॉ. प्रदीप तळवलकर, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

याप्रसंगी दोन क्रीडा शिक्षक / संघटक यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून यासह २५ शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Protected Content