Home Cities रावेर लग्न जुळत नसल्याने २४ वर्षीय तरुणाची आत्महत्त्या

लग्न जुळत नसल्याने २४ वर्षीय तरुणाची आत्महत्त्या


6684959 3d person puppet hanging in a rope loop

रावेर (प्रतिनिधी) लग्न जुळत नाही म्हणून पाल येथील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना आज घडली. या बाबत रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देविदास मयाराम भील (वय २४) असे आत्महत्त्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

पाल येथे तो आई -वडिलांसह राहत होता. दोन वर्षापासून त्याच्या लग्नासाठी स्थळ पाहण्याचे काम सुरु होते, परंतु लग्न जुळत नसल्याने तो निराश झाला होता. अखेर आज त्याने या नैराश्यातून सातपुडा विकास महामंडळाच्या केळीच्या शेतात आंब्याच्या झाडाला फांदीवर ओढणी बांधून गळफास घेतला. ही घटना दुपारी उघडकीस आली. याबाबत मयाराम उखा भील यांनी रावेर पोलिस ठाण्यात खबर दिल्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. बाविस्कर करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound