धानोरा (प्रतिनिधी) येथे आयोजित लोकसहभागातुन सुरु करण्यात आलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकेमार्फत गरजु व गरीब विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी मोफत वही, पेन वाटप करण्यात आले. यावेळी तब्बल २१०० वह्या, पेन यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील प्राथमिक मराठी शाळा, ऊर्दू शाळा, सातपुडा पर्वतातील बढाई, बडवाणी येथिल सर्व विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले. सपोनि मनोज पवार तसेच माजी उपसभापती माणिकचंद महाजन यांनी अभ्यासिकेतर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परीषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील, अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच किर्ती पाटील, इंद्रायणी सर्व्हिसेसचे महेंद्र पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष जितेंद्र कोळी, दुध संस्थेचे माजी चेअरमन किरण पाटील, केंद्रप्रमुख अंबादास पाटील, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, मुख्याध्यापक मुरलीधर बाविस्कर, आश्रमशाळेचे हितेंद्र पाटील, गोकुळ पाटील, अनंत महाजन, कविता पाटील, उषाबाई भोई, सर्व शिक्षक-शिक्षिका आदी उपस्थित होते.
वह्या,पेन देणारे दानशुर दात्यांमध्ये इंद्रायणी सर्व्हिसेस पुणे येथील महेंद्र पाटील, डॉ. चंद्रभान पाटील, नाशिक येथील योगेश पाटील, सुर्यकांत खांडेभराड, धानोरा येथील सदगुरु स्टील, क्रीडा शिक्षक देविदास महाजन यांचा समावेश आहे.गावातील प्राथमिक शाळा, ऊर्दू शाळा, रिलायबल क्लासेस, सातपुडा पर्वतातील बडवाणी, बढाई पाड्यावरील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन यांचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहा-यावर प्रसन्नता दिसुन आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल कोळी, ज्ञानेश्वर कोळी, सागर महाजन, हितेश महाजन, चेतन महाजन, दत्तात्रय पाटील, विलास सोनवणे यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचलन प्रशांत सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन तायडे यांनी केले.