जळगाव (प्रतिनिधी) येथील एमआयडीसीमधील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमधील तब्बल २० हजार झाडे व्यवस्थापकासह इतरांनी बेकायदेशीररीत्या तोडून त्यांची विल्हेवाट लावल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल व्हावा म्हणून एमआयसीसी पोलीसात तक्रारी अर्ज दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि, जळगावातील कंत्राटदार व नर्सरी चालक असलेले असलेले एन.आर. जाधव (वय-55) रा. मु.जे. कॉलेज परीसर यांनी भारत पेट्रोलियम येथे २० एकर जागेत झाडे लावून ती जगविली होती. मात्र मोठी झालेल्या या झाडांची कत्तल गेल्या काही वर्षापासून होत असून त्यांची मोठ्या प्रमाणत विक्री करण्यात येऊन विल्हेवाट लावण्यात आली आहे. यात व्यवस्थापक अमित नरुला, अमित व्यास व इतरांनी मिळून हि झाडे तोडून संगनमताने त्यांची विल्लेवाट लावल्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले असून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, मी नर्सरी कंत्राटदार देखील आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियम एल.पी.जी. प्लांट जळगाव येथे मी २० एकरात झाडे लावून जवळपास 20 हजार झाडे जगवली होती. सर्व झाडे हि मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे तेथे पर्यावरण देखील व्यवस्थित होते, त्याठिकाणी कंपनीचा मोठा प्लांट देखील अस्तित्वात असून तो चालू परिस्थितीत आहे. तेथे कोणत्याही प्रकारचे झाडे लावणे किंवा तोडण्यासाठी शासनाची अधिकृत अधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घ्यावी लागते. सदर परवानगी न घेता व्यवस्थापनाचे अधिकारी ह्यानी झाडांची बेकायदेशीर कत्तल करणारे कामगार व कत्तल झाडे विकत घेणारे वाहनाच्या साह्याने वाहतूक करणारे यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात झाडाची स्वत:च्या फायद्यासाठी कत्तल करून त्याची विल्हेवाट केली आहे. सदर झाडे तोडू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने कायदा तयार केला आहे, त्याची देखील पर्वा न करता स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.