भोर (वृत्तसंस्था) पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याचा निषेध म्हणून भोर नगरपालिकेच्या सर्व २० नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
आमदार संग्राम थोपटे यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांकडून काँग्रेसच्या निषेधाचा काळा फ्लेक्स बनवून तो पेटवून देण्यात आला आहे. तर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला जात आहे.