नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय लॉकडाऊननंतर २५ मार्चपासून टोल वसुली अनिश्चित काळासाठी बंद केली होती, जेणेकरुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा. परंतू २० एप्रिलपासूनच आता पुन्हा टोल वसुली सुरु होणार आहे. मात्र, वाहतूक उद्योगीशी संबंधित वर्गाने या निर्णयाचा विरोध केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. काल, 17 एप्रिल रोजी प्राधिकरणाने हे आदेश जारी केले असून या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व ट्रका आण मालवाहू वाहनांच्या आंतरराज्यीय हालचालीसाठी परवानगी दिली आहे. एनएचएआयने गृह मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी आणि टोल वसुली २० एप्रिल २०२० पासून सुरू करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.