टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी ‘2 हजार’ अर्ज

ravi

मुंबई प्रतिनिधी । वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. रवी शास्त्री यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी 5 जणांचे अर्ज आले असून बंगलोर मिररने केलेल्या दाव्यानुसार मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास 2 हजार अर्ज आले आहेत.

मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडे असेल आणि या प्रक्रियेत कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पण, कॅप्टन विराट कोहलीनं या पदासाठी रवी शास्त्रींच्या पक्षात वजन टाकल्यानं निवड प्रक्रियेत नवीन वळण येण्याची चिन्हे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माज व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनीही फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेनं आतापर्यंत अर्ज न केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Protected Content