पाचोरा (प्रतिनिधी) येथील श्री गायत्री परिवाराच्या युवती व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप गुरुवार दि.२ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला आहे.
नारीशक्ती चे महत्त्व आणि महात्म्य ओळखून या समारोपा निमित्ताने १८५ कन्यांचे (युवतींचे) पूजन करण्यात आले. येथील पालिकेच्या राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये श्री गायत्री परिवार, स्वयं सिद्धा ग्रुप व शांतिकुंज हरिद्वार यांच्यावतीने ४ दिवसांचे उंच माझा झोका घोषवाक्या अंतर्गत कन्या कौशल्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात चार दिवस हरिद्वार येथील संध्या तिवारी माधुरी वर्मा निधी विश्वकर्मा सुषमा पवार व दिनेश विश्वकर्मा यांनी शिबिरात सहभागी युवतींना व्यक्तिमत्व विकासासह भारतीय संस्कृतीतील आदर्शत्वा संदर्भात मार्गदर्शन केले. काही शिक्षकांचा शिबिरात गुणगौरव करण्यात आला. या शिबिरात हार्मोनियम तबला टाळ मृदुंग यांच्या गजरात विविधांगी गायत्री परिवाराची गीते सादर करण्यात आली. गायत्री परिवाराच्या विविधांगी धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची ची माहिती ही देण्यात आली. गुरुवार दि २ रोजी या शिबिराचा समारोप झाला. यानिमित्ताने १८५ कन्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला हे शिबीर यशस्वीतेसाठी गायत्री परिवाराच्या सुरेखा खानोरे यांचेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.