मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे १८ डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळत आहे. झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.अपघात दक्षिण-पूर्व रेल्वेच्या चक्रधातपूर विभागांतर्गत जमशेदपूरपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या बदबांबूजवळ झाला.
दक्षिण-पूर्व विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मुंबई-हावडा मेलचे जवळपास १८ डबे बदबंबूजवळ रुळावरून घसरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना बारांबू येथे वैद्यकीय मदत दिल्यानंतर त्यांना चक्रधरपूर येथे चांगल्या उपचारासाठी नेण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील खरसावा ब्लॉकमधील पोटोबेडा येथे हा रेल्वे अपघात झाला. एसईआरचे प्रवक्ते ओम प्रकाश चरण यांनी सांगितले की, जवळच मालगाडीचा आणखी एक टप्पा रुळावरून घसरला होता, परंतु हे दोन्ही अपघात एकाच वेळी झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १६ प्रवासी डबे, एक पॉवर कार आणि एक पॅन्ट्री कार होती, असंही त्यांनी सांगितलं.