*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांकडून एकूण ११ लाखांची कर वसुली करण्यात आली आहे. यामुळे मागील वीस वर्षांपासून शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या त्या जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा ग्रामपंचायत नेहमीच ग्रामस्थांना प्राथमिक सोईसुविधा मुबलक प्रमाणात देत असते. परिणामी ग्रामस्थ स्वतः हून ग्रामपंचायतीला येऊन कर भरणा करीत असतात. यामुळे ग्रामपंचायतीने यावर्षी एकूण ११ लाखांची वसुली केली आहे. दरम्यान गेल्या वीस वर्षांपासून शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या त्या जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरल्या आहेत. याबाबत सर्व स्तरातून ग्रामसेवक व्ही.व्ही.महाले, लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब प्रल्हाद पाटील, उपसरपंच रेखाबाई दगडू भिल व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक होत आहे. तत्पूर्वी ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी शंभर टक्के कर वसुली होत असल्याचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब प्रल्हाद पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.