नकली बियाणे रोखण्यासाठी यंदा जिल्ह्यात १६ भरारी पथके ; राज्य हद्दीवर २४ तास निगराणी (व्हिडीओ)

जळगाव  प्रतिनिधी । शेतकऱ्यांची यंदा खरीप हंगामात फसवणूक होऊ नये म्हणून नकली बियाणे रोखण्यासाठी यंदा जिल्ह्यात १६ भरारी पथके कृषी विभागाने नेमली आहेत जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य हद्दीवर यापैकी एक पथक २४ तास निगराणी ठेवणार आहे , अशी माहिती आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली . 

 

अजिंठा विश्रामगृहात आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरीप हंगाम आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाली , या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की , या बैठकीत कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर खरीप हंगामाची यंदाची तयारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला केलेल्या सूचनावरही चर्चा करण्यात आली जिल्ह्यात सध्या १ लाख ३३ हजार टन खतांचा साठा उपलब्ध आहे नकली बियाणे रोखण्यासाठी कृषी खात्याने १६ भरारी पथके नेमली आहेत जिल्ह्यात नकली बियाणे येऊ नये याची खबरदारी ही पथके घेणार आहेत प्रत्येक पथकाने एका दिवसात किमान ५ दुकानांची तपासणी करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांनी धूळपेरणी करू नये असे आवाहन कृषी खात्याने केलेले आहे १ वाण १ गाव ही संकल्पना राबवण्याचे ठरवण्यात आले आहे शेतकऱ्यांनी जैविक खतांच्या वापरासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यंदा किमान १ ० टक्के तरी रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण कमी व्हावे असे जिल्ह्यात उद्दिष्ट आहे कारण राज्यात रासायनिक खतांचा सर्वाधिक पुरवठा करणारा जिल्हा अशी जळगाव जिल्ह्याची ओळख आहे असेही ते म्हणाले .

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की , पीक विमा , कृषी कर्ज , केंद्राचा आणि राज्याचा पत पुरवठा , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज पुरवठा या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली बांधावर खते आणि बियाणे देताना संभाव्य टंचाईच्या परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली आहे जिल्ह्यात कृषी खात्यात ४९ टक्के कर्मचारी कमी आहेत राज्यभर अशी परिस्थिती आहे कर्मचारी वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे कोरोना संकटामुळे कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा फ्रंटलाईन योद्धे समजले जावे अशी मागणी आपण मंत्रिमंडळ बैठकीत करणार आहोत जिल्ह्यात २ / ३ कृषी खात्याचे कर्मचारी कर्तव्यावर असताना कोरोनामुळे दगावले आहेत शेतकऱ्यांना पुरेसा कर्ज पुरवठा होत नाही त्यामुळे जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांसोबत आधी २ दिवस बैठक घेण्यात आल्या त्यांना पुरेशा शेत कर्ज पुरवठ्याच्या सूचना देण्यात आल्या कारण शेती व्यवसायात ५२ टक्के रोजगार निर्मिती होते ही बाब कटाक्षाने बँकांच्या लक्षात आणून दिली आणि शेती कर्ज पुरवठ्याशी अजिबात तडजोड केली जाऊ नये अशी ताकीद देण्यात आली . कोरोना योद्धे म्हणून दगावलेल्या जिल्ह्यातील ४ पोलीस वारसांना प्रत्येकी ५० लाखांची सरकारी मदत देण्यात आली आहे आता अशा मदतीच्या पोलीस खात्यातील प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल जिल्ह्यात अस्याप कुठूनही पाण्याच्या टँकरची मागणी झालेली नाही विंधनविहिरीचें पाणी काही भागात कमी झालेले आहे त्यामुळे गरज असेल तेथे विहिरींचे अधिग्रहण केले जाईल यंदा पाण्याची खूप मोठी टंचाई जिल्ह्यात किंवा राज्यात जाणवणार नाही असा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले .

Protected Content