यावल, प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे मतदार नोंदणी प्रचार आणि प्रसार हेतुने एम. पी .मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एम .डी. खैरनार होते. याप्रसंगी मोरे यांनी मतदान हा प्रत्येकाचा हक्क असून १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली मतदार नोंदणी करून देशाची लोकशाहीस बळकट करण्यास आपले योगदान द्यावे असं आवाहन करत मतदार नोंदणी या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा.खैरनार यांनीही विद्यार्थ्यांना स्वतः नोंदणी करत आपले घर आणि परिसरातील नागरिकांनाही नोंदणीसाठी जागृत करण्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले. विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. एस .पी. कापडे यांनी आभारमानले. कार्यक्रमास प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. पी. व्ही. पावरा ,प्रा. आर .डी .पवार यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.