पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त देशभरात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्याच उत्साहात पारोळा शहरातही ७ नोव्हेंबर रोजी सकाळी एन.ई.एस. हायस्कूलच्या पटांगणावर भव्य ‘वंदे मातरम्’ दीडशे वर्ष पूर्णत्त्वाच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील तब्बल ३५८ तालुक्यांतील ५ हजारहून अधिक देशप्रेमी नागरिक या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी झालेत.

हा उपक्रम हरी नारायण आपटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पारोळा यांच्या वतीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या पर्वावर एकात्मता आणि देशभक्तीचे प्रतिक म्हणून सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाचे आयोजन करण्यात आले. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार डॉ. उल्हास देवरे उपस्थित होते. गटविकास अधिकारी संजय मोरे हे सहअध्यक्ष म्हणून सहभागी झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, तसेच पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि डॉ. मनिष रघुनाथ करंजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि एकतेचा संदेश देणार आहेत.
या सोहळ्याच्या आयोजनात प्राचार्य अजीम शाह, जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नवनित व्ही. चव्हाण, तसेच आयटीआय पारोळाचे चेअरमन सारंग आत्तरदे आणि आयएमसी सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला. ‘



