नौकेतून येताहेत १५ दहशतवादी; केरळ किनाऱ्यावर हायअलर्ट

refugees boat middle sea social migration theme 66882519

तिरुवअनंतपुरम (वृत्तसंस्था) ‘आयएस’चे १५ दहशतवादी नौकेतून श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर हायअलर्ट जारी केला आहे. पोलिसांच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तटरक्षक दल आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

 

वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितल्यानुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींबाबतचे अशाप्रकारचे अलर्ट नित्याचाच भाग आहे. मात्र यावेळी नेमकी आकडेवारी सांगितलेली आहे. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. संशयास्पद नौकेबाबत तटरक्षक दलाच्या चौक्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व यंत्रणा २३ मे पासून हायअॅलर्टवर असल्याचेही तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सतर्क आहोत. मच्छिमार नौका आणि समुद्रात जाणाऱ्या लोकांना संशयास्पद नौकेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केरळमधील अनेक लोक अजूनही ‘आयएस’च्या संपर्कात आहेत, असा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. एप्रिलमध्ये श्रीलंकेत साखळी स्फोट घडवून आणले होते. त्यात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केरळमध्ये हायअॅलर्ट जारी करण्यात आला होता.

Add Comment

Protected Content