विवाहितेचा 15 लाख रुपयांसाठी छळ ; पती व सासऱ्या विरुद्ध गुन्हा

mahila

जळगाव प्रतिनिधी । डोंबिवली येथे घर घेण्यासाठी 15 लाख रुपये माहेरुन आणावे. यासाठी मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पतीसह सासऱ्याच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा हिमांशू पाटील (वय 25, रा. गुरुकृपा बंगले, चिंचवडे कॉलनी, वाल्हेकर वाडी, पुणे ह. मु. महालक्ष्मी)  प्रोव्हिजन जवळ शिव कॉलनी यांचे डोंबिवली येथील हिमांशू प्रदीप पाटील यांच्यासोबत 6 एप्रिल 2018 रोजी हिंदू रीती रिवाजाप्रमाणे विवाह झाला. त्यावेळी त्यांना 24 ग्रॅम सोन्याची चैन, 4 ग्रॅम सोन्याची लहान चैन तसेच साखरपुड्यात 17 ग्रॅमची प्लॅटिनम हिऱ्याची अंगठी,अशा वस्तू देण्यात आल्या होत्या.  पीडित विवाहित ही पुण्याला जॉबला आहे. तर तिचे पती हिमांशू हे डोंबिवली येथील कंपनीत कामाला आहे. दरम्यान, पती हिमांशू पाटील आणि सासरे प्रदीप बाबुराव पाटील यांनी नवीन घर घेण्यासाठी माहेरून 15 लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला होता. मात्र, विवाहितेने पैसे न आणल्यामुळे 13 जानेवारी 2019 रोजी घरातून हाकलून दिले. पती कडील काही मंडळी आणि विवाहितेचे कडून काही मंडळी यांनी मिळून बैठक बसली असतांना, देखील पती व सासऱ्यांनी 15 लाख रुपये द्यावे. तरच नांदायला यावे असे सांगितले होते. त्यामुळे अखेर पीडित विवाहितेनेने पती हिमांशू प्रदीप पाटील आणि सासरे प्रदीप बाबुराव पाटील यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

Protected Content