पाचोरा प्रतिनिधी । शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 31 जुलै रोजी सरपंच व उपसरपंच परिषद आयोजित करण्यात आल्यामुळे तालुक्यातून पंचायत समिती सभापती यांच्या नेतृत्वाखाली परिषदसाठी 145 सरपंच व उपसरपंच रवाना झाले आहेत.
तालुक्यातून पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातून १४५ सरपंच व उपसरपंच रवाना झाले. त्याप्रसंगी सभापती बन्सीलाल पाटील, सभापती सुभाष पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी विलास सनेर, विस्तार अधिकारी एस.पी.पाटील, आर.एस.धस, आर.टी.सैदाने, सरपंच समिती अध्यक्ष एम.डी.पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पी.आर.पाटील, सचिव एस.एस.सत्रे तसेच सर्व सरपंच व उपसरपंच हजर होते.