सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडी राहणार सुरु

जळगाव, प्रतिनिधी ।  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला सोमवारी १६ ऑगस्ट रोजी पारशी नववर्षाची सरकारी सुट्टी असली तरीही ओपीडी मात्र सुरु राहणार आहे. 

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे २२ जुलै रोजीपासून कोरोनाविरहित रुग्णांच्या सेवेसाठी पूर्ववत सुरु झाले आहे. येथे विविध आजारांवर वैद्यकीय मार्गदर्शन करून उपचार केले जात आहे. अत्याधुनिक यंत्रणांचा देखील सर्वसामान्य रुग्णांना लाभ मिळत आहे.  सोमवार १६ ऑगस्ट रोजी रुग्णांनी वैद्यकीय सेवेचा सकाळी नियमित ९ ते १ या वेळेत लाभ घ्यावा अशी माहिती रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी दिली आहे.

 

Protected Content