Home क्रीडा शिवक्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत 123 खेळाडूंचा सहभाग

शिवक्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत 123 खेळाडूंचा सहभाग


जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन सानेगुरुजी वाचनालय जिल्हापेठ येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत एकूण 123 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यात १०/१२/१४ व १७ वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धा होत आहेत.


स्पर्धेचे औपचारिक उदघाटन फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू धनंजय धनगर व मराठा सेवा संघाचे सुमित पाटील यांनी केले. त्यावेळी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक फारूक शेख, शिवजयंती महोत्सव समितीचे माजी नगरसेवक अजय पाटील, संभाजी बिग्रेडचे अविनाश बाविस्कर उपस्थित होते. आज (गुरुवार) स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुष्कर टाटीया, रिषभ जैन, महेश चौधरी, फरहान चित्रे, श्रुती केसकर, चिन्मय बाविस्कर, स्वरा साने, प्रेषित पाटील मैत्री घासणे, निव वेद हे आप आपल्या गटात आघाडीवर आहेत. प्रास्ताविक व सूत्रसंचालन फारूक शेख यांनी यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून शैलेश जाधव,अनिकेत आळवणी, अमित चौधरी व पुष्परथ चखमा हे काम पहात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound