Home Cities जामनेर बोदवड नगर पंचायत निवडणुकीत १२ अर्ज अवैध

बोदवड नगर पंचायत निवडणुकीत १२ अर्ज अवैध

0
36

बोदवड प्रतिनिधी । नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार जागेच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवार अर्जांची नुकतीच छाननी करण्यात आली असून एकूण ३५ पैकी २३ अर्ज वैध व १२ अवैध घोषित करण्यात आले आहे.

निवडणूक अधिकारी रामसिंग सुलाने तर सहाय्यक निवडणूक अधिकारी आकाश डोईफोडे होते. उमेदवार माघार घेण्यासाठी 10 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे त्या दिवशी एकूण किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील यांचे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल, दरम्यान अपक्ष उमेदवारांची माघार होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तरी काही डमी अर्ज माघार होतील.

 


Protected Content

Play sound