शिंदे यांच्या खात्याला अडीच वर्षात ११९३५ कोटी ! : आकडेवारी जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह सहकारी मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप केला असला तरी खुद्द शिंदे यांच्या खात्याला अडीच वर्षात ११,९३५ कोटी रूपयांचा भरघोस निधी देण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आपल्याला पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. यात विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते असल्याने ते फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देत असल्याचा आरोप देखील वारंवार करण्यात आलेला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून हा आरोप करण्यात येत असून बंडखोरांचा मोठा रोष अजित पवार यांच्यावर असल्याचे दिसून आले आहे.

 

या पार्श्‍वभूमिवर, आज अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास यांच्या खात्याला अडीच वर्षांमध्येच ११९३५ कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात आल्याची माहिती जाहीर केली आहे. यामुळे आपल्याला कमी प्रमाणात निधी मिळाल्याचा त्यांचा दावा तकलादू असल्याचे अधोरेखील झाले आहे. तर शिंदे यांच्याप्रमाणेच इतर बंडखोर आमदारांच्या खात्यांच्या निधीची माहिती देखील लवकरच प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

 

Protected Content